तुळजापूर (प्रतिनिधी)- नगरपरिषदे वतीने दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक 24 रोजी अतिक्रमण हटाव मोहीम युद्ध पातळीवर राबवली. आज दीपक चौक घाटश्री रोड घाटशिर रोड वाहनतळ कुंभार गल्ली या भागातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आले. नगराध्यक्ष विनोद गंगणे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे.
सदरील अतिक्रमणे पी आर कार्ड नुसार काढण्याची मागणी होत आहे. श्री तुळजाभवानी मंदिरासमोर भवानी रोडवर श्री तुळजाभवानी मंदिरासमोर गुरुवारी सकाळी अतिक्रमणे काढण्यात आले होते. अतिक्रमण हटाव मोहीम कडकपणे राबवल्याने भाविक शहरवासिय नगरपालिकेस धन्यवाद देत आहेत. अतिक्रमण हटावामुळे तुळजाभवानी मंदिर महाद्वार पुन्हा दिसू लागले. अनेक रस्त्याने पुनश्चिम मोकळा श्वास घेतल्याने भाविकांमध्ये समाधान; व्यक्त होत आहे. काढण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या ठिकाणी पुनश्चाने अतिक्रमणे होऊ नये याबाबत नगरपालिकेने योग्य ती काळजी घेण्याची मागणी होत आहे.
