तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे गुरुवार (दि. 23) रोजी पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला चढवून तब्बल 11 जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. त्यात पाच महिला व एक बालकाचा समावेश आहे. सदर जखमी मध्ये तुळजापूर, बोरी, बसवंतवाडी, वडगाव लाख, शिराढोण येथील जखमींचा समावेश असून काहींन वर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा कुत्रा कमानवेस परिसरात फिरत होता. याच भागातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक नागरिकांना त्याने चावा घेतला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, कमानवेस भागातील नगरसेवक रणजीत इंगळे व प्रगती कदम यांच्या प्रयत्नांतून शुक्रवारी मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबवली.
