धाराशिव (प्रतिनिधी)-  ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेतील माजी पर्यवेक्षक  गोवर्धन एकनाथराव यादव वय 91 रा. धाराशिव यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले .त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले ,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी विद्यासागर यादव व वजन मापे निरीक्षक अविनाश यादव यांचे ते वडील होत. तसेच  एस.टी.कामगार संघटनेचे चंद्रकांत मुळे यांचे ते मेहुणे होत. त्यांच्यावर कपिलधार स्मशानभूमीत  सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top