तुळजापूर (प्रतिनिधी)- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त तुळजापूर नगरीत गटनेते औदुंबर कदम व त्यांच्या सौभाग्यवती हेमा कदम यांच्या वतीने अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकर प्रेमींना पंचमिठाईचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात नगरसेविका प्रिया विजय गंगणे, जयश्री विजय कंदले, सरोजाताई नरेश अमृतराव, नीताताई शिरसागर, मस्के ताई, शीला कदम तसेच नगरसेविका हेमा औदुंबर आणि औदुंबर कदम मित्रपरिवार यांच्या सहभागातून मिठाई वाटप करण्यात आले.

या उपक्रमाबाबत बोलताना संयोजक औदुंबर कदम म्हणाले, “महामानवांच्या जयंतीदिनी सर्वांचे तोंड गोड व्हावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम सुरू केला. अनेक वर्षांपासून तो सातत्याने राबवत असून दरवर्षी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. पुढेही हा उपक्रम सुरू ठेवणार आहे.

यावेळी विशाल कदम, अरविंद कदम, जयवत कदम, दयानंद कदम, दीपक कदम, बापू कदम, निलेश कदम, अंकुर कदम, राजरत्न कदम, पियुष कदम यांच्यासह औदुंबर कदम मित्र मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top