धाराशिव (प्रतिनिधी)- आरटीई 25% मोफत प्रवेश प्रक्रिया ही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. मात्र, सध्याच्या प्रवेश प्रक्रियेत काही तांत्रिक बाबींचा गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनक करणार असल्याचे निवेदन  मराठवाडा शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणार आले आहे.

आहे की, वास्तव्याच्या पुराव्यासाठी आवश्यक असलेल्या 3 किमी अंतराच्या मर्यादेबाबत अनेक साशंकता निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी केवळ प्रवेशाच्या उद्देशाने तात्पुरते किंवा केवळ कागदोपत्री भाडेकरार करून नियमावलीचे उल्लंघन केले जात असल्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारे निवासाचा पत्ता बदलून दाखवण्याच्या प्रवृत्तीमुळे जे स्थानिक आणि खरोखर गरजू लाभार्थी आहेत, त्यांच्यावर अन्याय होत आहे.

त्याचप्रमाणे, उत्पन्नाच्या मर्यादेबाबतही अशीच परिस्थिती असून, सादर केलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रांच्या सत्यतेबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणारे पालक चुकीच्या माहितीच्या आधारे लाभ घेत असतील, तर ते या योजनेच्या मूळ हेतूला हरताळ फासणारे आहे. तरी केवळ कागदोपत्री पुराव्यांवर विसंबून न राहता, संशयास्पद वाटणाऱ्या प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून किंवा सखोल चौकशी करूनच प्रवेश निश्चित करावेत. खऱ्या आणि मूळ लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळावा आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जावी, मागणी मान्य न झाल्यास मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असेही संघटनेचे जिल्हाध्यक्ष जे. एस. शेरखाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

 
Top