भूम (प्रतिनिधी)- कसबा येथील श्रीराम मंदीरात श्री परशुराम जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत ह. भ. प. भालचंद्र देव बीड यांचे नारदिय किर्तन पार पडले. यानंतर श्री परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पवृष्टी करण्यात आली. या नंतर महाआरती होवुन प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ब्राम्हण समाजातील जेष्ठ नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यासाठी भूम तालुका ब्राम्हण संघटना पदाधिकारी व समाज बांधवांनी विषेश परिश्रम घेतले.


 
Top