धाराशिव (प्रतिनिधी )- येथील समर्थ मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेला भव्य नोकरी मेळावा अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडला. या मेळाव्याला जिल्ह्यातील विद्यार्थ्यां व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थित तरुणांशी संवाद साधताना नोकरी आणि करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कौशल्य विकासावर भर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपल्या मार्गदर्शनात केवळ पदवीवर अवलंबून न राहता, आजच्या स्पर्धेच्या युगात आवश्यक असणारी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. नोकरी मिळवण्यासाठी पूर्वतयारी कशी करावी आणि उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून स्वतःची प्रगती कशी साधावी, यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला. “युवकांनी अशा उपक्रमांचा आणि संधींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. केवळ नोकरी शोधणारे न बनता, स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर आपले आणि देशाचे भविष्य उज्ज्वल घडवावे,“ असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यांनी पात्र उमेदवारांची प्राथमिक मुलाखत घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या युवक-युवतींमुळे या मेळाव्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सदरील मेळाव्यात नामांकीत कंन्यामध्ये काम करण्यास इच्छुक आहेत ज्यांना हजर राहता आले नाही त्यांनी सुनिल सर, मो. नं. 9223005150, शाम सर मो. नं. 9975745294, संदिप सर मो. नं. 9271048663 या नंबरवर संपर्क साधावा.
