भूम (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे वाचन करुन आपल्याला भावलेले बाबासाहेब स्वतःच्या शब्दात विषद केले आहेत. हे हस्तलिखित अत्यंत वाचनीय व दिशादर्शक बनले असुन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन अच्युत मुळे यांनी केले.जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आष्टा शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्मरण बाबासाहेबांचे या हस्तलिखिताचे प्रकाशन केंद्रप्रमुख अच्युत मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. हस्तलिखीताचे संपादन वैष्णवी बनसोडे, उपसंपादक प्रद्युम्न कदम, कार्यकारी संपादक श्रुती पंडित, संकलन आदिती शेळके व मुखपृष्ठ वैष्णवी वाघमारे यांनी केले आहे. हस्तलिखीतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनातील विवीध प्रसंग, चित्ररुप माहीती, काव्यातुन उमगलेले बाबासाहेब, अशी विविध प्रकारची माहिती देण्यात आली आहे. शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नृत्य, गायन, वक्तृत्व, वाचन स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर गिलबिले, रवी वाघमारे, धनंजय घोलप, अरुण वाघमारे,बाळु चव्हाण, तसेच गावातील अनेक युवक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी भैरू गोरे,सुषमा नलवडे, वैशाली डांगे, विजयालक्ष्मी उपळकर, पुतळा जगताप यांनी प्रयत्न केले.
