तुळजापूर (प्रतिनिधी)- विश्व बंजारा दिवसा निमित्त धाराशिव जिल्ह्यातील महिला भगिनींसाठी सांस्कृतिक जतन आणि परंपरेची ओळख अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते मल्हार पाटील यांच्या वतीने नांदेड गुरुद्वारा, रेणुकादेवी, पोहरादेवी, बणजारा विरासत भवन येथे भव्य दर्शन व अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पोहरादेवी येथे उभारलेले भव्य नंगाराभवन हे बंजारा समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे परंपरेचे आणि अस्मितेचे जीवन प्रतीक आहे. ही केवळ एक वस्तू नसून आपल्या संस्कृतीचा अभिमान जपणारे प्रेरणास्थान आहे. आपल्या पुढील पिढ्यांना या समृद्ध वारसांची जाणीव व्हावी आणि त्यांच्यात आपल्या संस्कृतीचा अभिमान निर्माण व्हावा या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
उमरगा येथुन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, युवा नेते मल्हार पाटील यांच्या उपस्थितीत या अभ्यास दौऱ्याचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी सभापती प्रकाश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई जाधव, जिल्हा परिषद सदस्य शहाजी पाटील, युवराज जाधव यांच्या सह उमरगा, लोहारा, तुळजापूर येथील बंजारा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
