धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेनेचे धाराशिव तालुका प्रमुख तथा नूतन जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांनी रूपामाता उद्योग समूहाच्या प्रधान कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी रूपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अँड. अजित गुंड पाटील यांच्या हस्ते लाकाळ यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या भेटीदरम्यान राजकीय, सामाजिक तसेच युवकांसाठी उद्योग व रोजगार निर्मिती या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला. या प्रसंगी अँड. शरद गुंड पाटील, अमोल गुंड पाटील, थळकरी, कैलास गोरे, प्रेमनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
