धाराशिव (प्रतिनिधी)- जवळगा बेट ता. उमरगा ग्रामपंचायतीच्या वतीने धाराशिव येथे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक रितू खोकार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड,सरपंच लक्ष्मी झाकडे, उपसरपंच सचिन वाडीकर, माजी सरपंच प्रभाकर बिराजदार, सुरेश झाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रितू खोकार यांनी आपल्या कर्तव्यदक्ष, धाडसी आणि प्रभावी कार्यशैलीमुळे धाराशिव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार व जनतेसाठी कार्यक्षम झाले असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.तसेच त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल व समाजाप्रती असलेल्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. उत्तरादाखल बोलताना रितू खोकार यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणा निर्माण झाली असून, युवकांना सकारात्मक दिशा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड,सरपंच लक्ष्मी झाकडे, उपसरपंच सचिन वाडीकर, माजी सरपंच प्रभाकर बिराजदार, सुरेश झाकडे उपस्थित होते.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top