धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त जिजाऊ रमाई संघर्ष फाऊंडेशनच्या वतीने 135 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत सलग चौथ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शहर व परिसरातील नागरीक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिजाऊ रमाई संघर्ष समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मंगळवार 14 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन सांजा रोड राम नगर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंड सांजा जिल्हा परिषद सदस्य प्रदीप घोणे, सांजा पंचायत समिती सदस्य राजदीप गायकवाड, नगरसेवक रवी वाघमारे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, संस्थेचे अध्यक्ष राज धज,नामदेव राठोड, गफूर शेख,संतोष धावारे, महेश लिमये, हनुमंत सूर्यवंशी,शंकर सूर्यवंशी, मालोजीराजे सूर्यवंशी,ओम सूर्यवंशी, प्रतीक साळवी, नामदेव राठोड, अनिल सूर्यवंशी, उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी भाजपा नेते व्यंकट गुंड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिजाऊ रमाई संघर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष राज धज यांनी केले.सूत्रसंचलन रणजीत राठोड यांनी तर आभार राकेश कचरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौतुक माने,कृष्णा भोसले,रणजीत राठोड,वैभव राठोड, अजय माने,परमेश्वर बळी,किरण राऊत, सागर अतकरे यांनी परिश्रम घेतले.
