कळंब (प्रतिनिधी)- भगवंताला आपलसं करण्यासाठी परमभक्ती करावी लागते यामुळे भगवंताशी एकरूप झाल्याने भक्त पूर्णपणे देवात विलीन होतो. हीच अद्वेत अनुभूती आहे या परमभक्तीमुळे  अहंकार नष्ट होतो असे  विचार ह. भ.प. ज्ञानसिंधू संदीपान महाराज हसेंगांवकर यांनी कळंब येथील कसबा पेठ भागातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जयंतीनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता प्रसंगी (2 एप्रिल) रोजी काल्याचे किर्तन सेवा प्रसंगी केले.

  किर्तन सेवेसाठी घेतलेल्या ज्ञानेश्वरीतील संत ज्ञानेश्वर माऊली यांचा अभंग- गवळण, “आपुलेनि भारे श्रीरंग डोलत गेले“ “अवचिते पाचारिले पाठिमोरे“यावर स्पष्टीकरण करताना व्यक्त केले.  भगवंताचे महत्त्व स्पष्ट केले. जगात सत्ता ,पैसा  याने शासन, प्रशासन ,समाज सुधारू शकत नाही  ही ताकत फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे  वारकरी संप्रदाय विश्व संप्रदाय बनावा , बुवाबाजी, ढोंगीपणा यावर वारकरी सांप्रदायातील संतांनी कडवट टीका केली आहे, असे प्रतिपादन केले तसेच त्यांनी संतश्रेष्ठ गोरोबा काका समाधी सोहळ्यानिमित्त तेर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

दुपारी 10 ते 12  या वेळेत काल्याच्या किर्तनास भाविकांची मोठी उपस्थिती होती. कळंब येथे 26 मार्च ते 2 एप्रिल हनुमान जयंती अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला 2एप्रिल रोजी सूर्योदय समयी हनुमान जन्मोत्सव मा ेठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी भक्तांनी लाडु,पेढे, प्रसाद वाटप केला यानंतर ह.भ.प. ज्ञान सिंधू संदीपान महाराज हासेगांवकर यांचेकाल्याचे किर्तन झाले. अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आचार्य विनोद शास्त्री महाराज वृंदावन निवासी यांनी शिवपुराण कथा, मान्यवर कीर्तनकारांची कीर्तन सेवा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, आदी कार्यक्रम संपन्न झाले. महाप्रसाद पंगत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी आप्पा कापसे, नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे यांच्यावतीने देण्यात आली.


 
Top