भूम (प्रतिनिधी)- आंद्रूड येथील जगदंबा देवी यात्रा उत्सव निमित्त गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे याही वर्षी कुस्त्याचा भव्य दिव्य फड भरवण्यात आला होता. परिसरातील नामांकित पैलवानासह सुप्रसिद्ध नेपाळ येथील देवा थापा सह कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या. पैलवान देवा थापा याची चित्त थरारक कुस्ती पार पडली.सर्व प्रेक्षकांची मने थापा याने जिंकली. अतिशय उत्साहामध्ये हा यात्रा उत्सव पार पडला.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे नेते जिल्हा परिषद मा.उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मा. धनंजय सावंत आवर्जून उपस्थित होते. तसेच याच गावचे मा.जिल्हा परिषद सदस्य प्रा.ज्ञानेश्वर गिते, उपसरपंच निवृत्ती तावरे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाजीराव लिमकर, दादासाहेब फौजी लिमकर, सुनील लिमकर साहेब, संजय लिमकर, रामलिंग लिमकर, माऊली वालेकर, जीवन लिमकर, उद्धव लिमकर, परमेश्वर गीते, शिवाजी लिमकर, अभिमान लिमकर, सुग्रीव लिमकर, भास्कर लिमकर, पांडुरंग लिमकर आदी जेष्ठ गावकरी गावकरी मंडळी तसेच युवामंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
