तेर (प्रतिनिधी)- श्री संत गोरोबा काका यांचा वार्षीक सोहळ्यासाठी विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनेचा आढावा नायब तहसीलदार महादेव शिंदे यांनी घेतला. सहा एप्रिल पर्यंत पुर्ण तयारी झाली पाहिजे अशी सुचना शिंदे यांनी केली आहे.
30 मार्च रोजी तेर येथील संत गोरोबाकाका यांच्या मंदिरात विविध शासकीय विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संत गोरोबाकाका व शिवमंदिर समितीचे प्रशासक तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त रूपाली कोरे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार महादेव शिंदे, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, पोलिस उपनिरीक्षक किशोर माळी, वैद्यकीय अधीक्षक डॉ गुरूबस शेटे, जागजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शाम पाटील, मंदिर समितीचे निरीक्षक अतुल नळणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याञेत गोरोबा काकांच्या समाधीचे दर्शन सुलभ होण्यासाठी मुख दर्शन,व,धर्म दर्शनासह भाविकांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे मंदिर समितीच्या प्रशासक रूपाली कोरे यांनी सांगितले. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व याञा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पोलिस विभागाने पोलिस उप विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सहा.पोलीस निरीक्षक, छेडछाड विरोधी पथक, अवैध धंदे विरोधी पथक यासह पोलीस, होमगार्ड आदी 250 पोलीस कर्मचारी बंदोबस्तास ठेवण्यात आले असल्याचे माहिती ढोकीचे पोलिस उपनिरीक्षक किशोर माळी यांनी बैठकीत दिली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी फिरते शौचालय, महिला,पुरुष यांच्या साठी स्वतंत्र अंघोळीची सोय, याञेतील स्वच्छता, पाणी पुरवठा याचे योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब खोचरे व उपसरपंच श्रीमंत फंड यांनी ही उपाययोजनेची बैठकीत माहिती दिली. यावेळी महावितरण, परिवहन महामंडळ, महाराष्ट्र जिवन प्राधीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्नीशामक विभाग कळंब, आरोग्य विभाग यांनी सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी महसूल मंडळ अधिकारी शरद पवार, ग्राम अधिकारी प्रशांत देशमुख, तेर दुरक्षेत्रचे बिट अंमलदार प्रदीप मुरळीकर, पोलीस पाटील फातेमा मनियार, विलास माळी, वारकरी फडकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज तांबे, साहेबराव सौदागर, सुधाकर बुकन,संगिता डोलारे, अजित कदम, किशोर काळे, विवेकानंद नाईकवाडी, अमोल कसबे, गणेश फंड, धनंजय आंधळे, विजयकुमार खांडेकर, साहेबराव डक, अमोल सावंत, दैवशाला भोरे, राणी शिराळ, कविता आंधळे, मिरा गाढवे, अलका नाईकवाडी, सुषमा सरवदे, मुमताज तांबोळी आदी उपस्थिती होती. सुत्रसंचलन राजाभाऊ आंधळे यांनी केले.
