तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे आयोजित अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाच्या ठिकाणी 2 एप्रिलला सोमवल्ली प्रसाद घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी केली होती. 

सोमवल्ली म्हणजे पृथ्वीतलावरील अमृत आहे. ती दिव्य औषधी वनस्पती आहे. पूर्ण भारतामध्ये दुर्मिळ आहे. पण धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग घाट अभय अरण्य येथे सोमवल्ली मिळते. त्या सोमवल्लीचे पूर्ण तीन दिवस देशातून आलेल्या विद्वान ब्राह्मणाकडून त्रुग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेदाने अभिमंत्रण करून 2 एप्रिलला त्या सोमवल्लीचे हवण करण्यात आले. निरोगी आयुष्यासाठी, असाध्य रोग निट होण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या सोमवल्लीचा प्रसाद सर्व उपस्थित भाविक भक्तांना वाटत करण्यात आला. सोमवल्ली वनस्पती डोंगराळ भागात व कमी पाण्यावर येते व ती पान विरहीत रहाते. या सोमवल्ली वनस्पतीला प्रतिपदा ते पौर्णिमा एक एक पान येत जाते. तसेच प्रतिपदा ते अमावास्या एक एक पाण गळत जातात.परत हीच प्रक्रियामध्ये ही सोमवल्ली वनस्पती वाढत जाते..देश व विदेशातून सोमवल्ली वनस्पतीची माहिती घेण्यासाठी विद्वान येतात. देशात कोठेही सोमयाग यज्ञ आयोजित केला की सोमवल्ली ही धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग घाट अभय अरण्य येथून घेऊन जातात.

 
Top