धाराशिव (प्रतिनिधी)-: महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे व सातारा जिल्हा कलाध्यापक संघ, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 44 वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद मोठ्या उत्साहात स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद, सातारा येथे संपन्न झाली. या परिषदेत राज्यातील विविध भागांतील सुमारे 600 हून अधिक कलाशिक्षकांनी सहभाग नोंदवला. दोन दिवसीय परिषदेमध्ये कलाशिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, अध्यापनातील नाविन्य, तसेच शिल्पकला, चित्रकला, नृत्यनाट्य, गायन-वादन, हस्तकला व चित्रप्रदर्शन या विविध कला प्रकारांवर सखोल चर्चा व प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. परिषदेच्या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडख राज्यध्यक्ष नरेंद्र बाराई, कलासंचालक मुंबई किशोर इंगळे, चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा चंद्रकांत दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कौस्तुभ गावडे, राज्य सल्लागार पी. आर. पाटील, हिरामण पाटील मुबंई, राज्य उपाध्यक्ष बलराम सामंत, राज्य सरचिटणीस दिगंबर बेंडाळे, राज्य सहसरचिटणीस प्रकाश पाटील, सातारा जिल्हा कलाध्यापक संघ कार्याध्यक्ष किशोर कुदळे, जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, जिल्हासचिव विकास शेवाळे, सहसचिव सुनिल देसाई, कोषाध्यक्ष सागर सुतार, सहकोषाध्यक्ष राजेंद्र कुंभार, उपाध्यक्ष बाळासाहेब कचरे, सुनिल फरांदे, विभागीय उपाध्यक्ष एकनाथ कुंभार, पुणे जिल्हाध्यक्षा सौ.अश्विनी कदम, सचिव सुनिल बोरले, दादा लाड कोल्हापूर, लातूर विभागीय सहकार्यवाह दिलीप लाड तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली. या परिषदेमुळे कलाशिक्षण क्षेत्रात नवीन विचारांची देवाण-घेवाण होऊन अध्यापनात अधिक सुसंगती व गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होत.
असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी धाराशिव जिल्हा कलाध्यापक संघ जिल्हाध्यक्ष नानासाहेब , जिल्हासचिव शेषनाथ वाघ यांना सुनिल शेडगे लिखित साताऱ्याच्या सहवासात पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या समयी जिल्हाकार्याध्यक्ष शिवाजी भोसले , जिल्हाकोषाध्यक्ष किरण वाघमारे, कलाध्यापक दत्तात्रय खंडागळे उपस्थित होते. 44वी कलाशिक्षण परिषद कार्यशाळा भव्यदिव्य अनेक उपक्रमांने संपन्न झाली.
