धाराशिव (प्रतिनिधी)-  पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या पश्चिम बंगालमधील कामगार व व्यावसायिक बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आपल्या लोकशाहीच्या हक्काचा उपयोग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावून राज्याच्या विकासात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याच अनुषंगाने मतदानासाठी पश्चिम बंगालकडे प्रस्थान करणाऱ्या कामगार व व्यावसायिक बांधवांना माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सर्वांना सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देत, मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य असून, जबाबदार नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीला विजयी करण्याचे आवाहन करताना त्यांनी “कमळ” चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थिर शासनासाठी मतदारांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध जनसंपर्क अभियानांना व्यापक प्रतिसाद मिळत असून, विकासाभिमुख विचारसरणीला नागरिकांकडून पाठिंबा वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच, पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामगार व व्यावसायिक बांधवांमध्ये सकारात्मक वातावरण असून, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.


 
Top