भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील ईट येथील श्री. खोपेश्वर यात्रेनिमित्त भव्य असा कुस्त्यांचा फड भरवण्यात आला होता. सदरील कुस्त्यामध्ये धाराशिव, अहमदनगर, बीड, सोलापूर या जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक मल्लांनी सहभाग घेतला होता. येथील जिल्हा परिषदेचे शाळेच्या मैदानावर दुपारी पाच वाजता सुरू झालेला हा आखाडा रात्री साडेबारा वाजता संपला. पहिले बक्षीस 71000 व चांदीची गदा व खोपेश्वर केसरीचा पट्टा ठेवण्यात आले होते. हे बक्षीस परंडा तालुक्यातील कंडारी येथील हनुमंत पुरी याने पटकावले.
हे बक्षीस जिल्हा परिषद सदस्य दत्ता भोरे यांच्याकडून देण्यात आले होते. स्पर्धेतील दुसरे बक्षीस 61000 व स्मृती चिन्ह हे युवा उद्योजक गणेश थोरात यांच्याकडून ठेवण्यात आले होते. हे बक्षीस आष्टी येथील मनोज पवार व कुर्डूवाडी येथील रवी खैरे यांना विभागून देण्यात आले. स्पर्धेतील तिसरे बक्षीस 51000 व स्मृतीचिन्ह बाळू बहिरवाल (पाली जी.बीड) व संदीप लटके (जामखेड) या दोघांना विभागुण देण्यात आले. हे बक्षीस पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे यांच्याकडून ठेवण्यात आले होते. चौथ्या क्रमांकाचे बक्षीस 41000 हे संभाजीनगर येथील प्रसिद्ध डॉक्टर मनोज सासवडे यांच्याकडून देण्यात आले होते. सदरील बक्षीस पवन गाडे व पृथ्वीराज वनवे (जामखेड) यांना विभागून देण्यात आले. स्पर्धेतील पाचवे बक्षीस उमेश शिंदे डिघोळ व विकास गटकळ पाटोदा यांना विभागून देण्यात आले. हे बक्षीस शासकीय ठेकेदार प्रताप भोईटे 31000 यांच्याकडून ठेवण्यात आले होते.
या स्पर्धेला पंच म्हणून वस्ताद बाळासाहेब आवारे, विठ्ठल वाघमोडे, विठ्ठल देवकते, वसंत रसाळ, मामू जमादार, बप्पासाहेब चव्हाण, बापू खांडेकर, रघुनाथ वाघमोडे तर समालोचक म्हणून राशीन येथील युवराज सोलंनकर यांनी काम पाहिले. यात्रा कमिटीचे अध्यक्ष सरपंच असेल तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सुनील देशमुख, सयाजी हुंबे, युवराज हुंबे, अक्षय शिंदे, शंभूराजे देशमुख, नामदेव माळी, सुभाष हुंबे, परमेश्वर डोके, केशव चव्हाण, उद्योजक बालाजी हुंबे,यांच्यासह यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
