धाराशिव (प्रतिनिधी)- जलसंपदा विभाग धाराशिव पाटबंधारे मंडळ धाराशिव यांचे मार्फत जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे शुभारंभ  जिल्हाधिकारी कीर्तीकिरण  पुजार यांच्या हस्ते करण्यात आले

सदर कार्यक्रमादरम्यान पंधरवड्यात करावयाच्या सर्व कामाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी केले तसेच विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन याबाबत  चंद्रकांत पाटील उप अभियंता यांनी सादरीकरण केले कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देवांना मारदळकर अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील तसेच जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश खड्डे, अजित मदने, सलीम आवटी, नलावडे जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता महामुनी  सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाची कार्यकारी अभियंता व जलसंपदा विभागाचे सर्व उपविभागीय अभियंता शाखा अभियंता व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सांगता जल प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली या दरम्यान जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चालू वर्षी ला निनो च्या प्रभावामुळे पाणीटंच येण्याची शक्यता असून त्यामुळे थेंब थेंब पाण्याचे नियोजन करण्याचा आवाहन केलं व सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त करून व्यक्त करून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले शेवटी आभार प्रदर्शन कार्यकारी अभियंता अमोल  नाईक यांनी आभार मानले

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top