भुम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील डोकेवाडी येथे गेल्या 59 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाची गुढी मोठ्या उत्साहात उभारी जात आहे. मात्र यावर्षी भक्तिमार्गाबरोबर सामाजिक ऋणांची हरिनाम सप्ताह मध्ये रक्तदान शिबिर घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत सविस्तर अशी केली भूम तालुक्यातील डोकेवाडी या गावी गेल्या 59 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण यावर्षी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे यांच्या पुढाकारातून अखंड हरिनाम सप्ताह सोबत महाआरोग्य शिबिर आयोजित करून यामध्ये गावातील 471 रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषध उपचार देण्यात आले.
गावातील 52 तरुणाने उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी बार्शी येथील भगवंत ब्लड बँकेने सहकार्य केले. या शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शिनगारे, गट विकास अधिकारी वाजे, रवींद्र पवार, शिवाजी जालना, चंद्रकांत डोके, भाऊसाहेब खैरे, बळीराम कलबड, ग्रामसेवक दीपक गोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज अखंड हरिनाम सप्ताहच्या शेवटच्या दिवशी हभप शिवलीलाताई पाटील यांचे काल्याचे किर्तन होऊन सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी वैशाली मोटे, शुभांगी देशमुख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
