तेर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, धाराशिव, पंचायत समिती, धाराशिव,तेर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त पशुप्रदर्शन व संकरीत वासरांचा मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.                           

या पशुसंवर्धन प्रदर्शनात संकरीत वासरे गटात प्रथम गुंडा थोडसरे (तेर), देशी बैल गटात प्रथम गुंडा थोडसरे (तेर), संकरित गाय गटात प्रथम विजय बारकुल (येरमाळा), देशी गाय गटात प्रथम अजय शिंदे (किणी), देशी कालवड गटात प्रथम शिवाजी पडूळकर (तेर), म्हैस रेडी गटात प्रथम बालाजी मस्के (तेर), गु-हा म्हैस गटात प्रथम संकेत झिंजे (तेर), म्हैस गटात प्रथम मच्छिंद्र कोकरे (तेर) विजेते ठरले. पशुप्रदर्शाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा कदम, पंचायत समिती सदस्या जया नाईकवाडी, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवनाथ नाईकवाडी, युवराज शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय पांडे यांनी केले. तर आभार पी.जे.नाथबुवे यांनी मानले.   


 
Top