उमरगा (प्रतिनिधी)- शांतिदूत परिवाराच्या वतीने 29 एप्रिल 2026 रोजी उमरगा येथे आयोजित समारंभात माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांना ‘शांतिदूत पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त करत सामाजिक कार्याची जबाबदारी अधिक वाढल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमास आकांक्षा चौगुले,सभापती, पंचायत समिती उमरगा, डॉ. विठ्ठल जाधव, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रल्हाद सूर्यवंशी,पोलीस निरीक्षक, सौ. उषाताई गायकवाड, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद धाराशिव लताताई मोरे, विद्याताई जाधव, प्रा. जीवन जाधव, प्रा. अभयकुमार हिरास, प्रा. युसुफ मुल्ला, प्रा. भैरवनाथ कानडे, सुलक्षणा शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.सन्मान स्वीकारताना डॉ. गायकवाड यांनी समाजात शांतता, सौहार्द आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. हा पुरस्कार वैयक्तिक नसून समाजातील सहकाऱ्यांच्या विश्वासाचा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले.
