धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार,दि.1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
या प्रमुख शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.राज्याच्या स्थापनेचा अभिमान जागवणाऱ्या या सोहळ्यात स्वातंत्र्य सैनिक,लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी,कर्मचारी,विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
