धाराशिव (प्रतिनिधी)- बार्शी येथे रोटरी ओपन टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या ओपन टेबल टेनिस स्पर्धेत धाराशिव येथील खेळाडू स्वदिप नवले याने भाग धेऊन तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळविले. त्याच्या या यशाबद्दल धाराशिव जिल्हा क्रीडा मंडळाच्या वतीने कोच विल्सन दलभंजन, श्री सिद्धेश्वर बेलुरे व सर्व टेबल टेनिस खेळाडूंनी त्याचे कौतुक केले आहे. स्वदीप नवले हा विद्यार्थी श्री.श्री रविशंकर विद्यामंदिर धाराशिवचा विद्यार्थी आहे. त्याने सदर स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला.


 
Top