भूम (प्रतिनिधी)- केंद्र सरकारकडून इ.12वी पर्यंत दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यासाठी इयत्ता आठवीच्या वर्गातील मुलांसाठी  NMMS ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते. 2026 साली घेतलेल्या परीक्षेत जिल्हा परिषद हायस्कूल भूमचे 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पैकी चंदन अमोल जगदाळे व अदिती अर्जुन मदने हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. हे दोन्हीही विद्यार्थी भूम शहरात अनुक्रमे प्रथम व द्वितीय आहेत. परंतु अदिती अर्जुन मदने या विद्यार्थिनीने  NTC प्रवर्गात धाराशिव जिल्ह्यात 128 गुण घेऊन प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदर्श पालक तलाठी प्रकाश पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत साळुंखे यांच्या हस्ते शाल व पुस्तक भेट देऊन करण्यात आला. अमोल जगदाळे यांनी शाळेचे कौतुक केले. प्रकाश पाटील म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास केला पाहिजे. शिक्षकांनी शाळेत जे अध्यापन केले आहे. त्याचा नियमित सराव केल्यास आणि आपल्या अडचणी त्या-त्या वेळी शिक्षकांना विचारल्यास नक्कीच विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात असे सांगितले.“ NMMS सराव परीक्षा  प्रमुख पवार काकासाहेब यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले आहे .कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते. कार्यक्रमाला पालक अमोल जगदाळे,अर्जुन मदने,काकासाहेब पवार, उत्तरेश्वर पायघन,दयानंद पाटील, अविनाश जोशी, राजेंद्र गाडे, श्रीमती प्रतिभा मुकटे, नितीन पवार ,कैलास शिंदे, हरीश साठे आनंता  झरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले.

 
Top