तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील तामलवाडी येथे पोलिसांनी मिलन लॉजवर छापा मारून अनैतिक देह व्यापार करणाऱ्या दोघा जणांविरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या तीन महिलांपैकी दोन महिला या बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. सदरील कारवाई अनैतिक मानवी वाहतुक शाखेच्या पथकाने केली.

याबाबत अधिक माहिती अशी की अनैतिक मानवी वाहतुक शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, तामलवाडी येथील मिलन लॉज येथे दोन आरोपी हे काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने नमुद ठिकाणी छापा टाकला असता हॉटेल मिलन लॉज तामलवाडी येथे तीन महिला आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता आरोपी  दिलीप सिध्दाप्पा मंगरुळे, वय 43 वर्षे, रा. अविनाश नगर एम आय डी सी सोलापूर, ह.मु. मिलन लॉज तामलवाडी, संतोष नामदेव पवार, वय 40 वर्षे, रा. तिऱ्हे ता. उत्तर सोलापूर ह.मु. मिलन लॉज तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते. नमुद तिघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले. यावरुन पथकाने नमुद आरोपींना  ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन 2, पिग्मीचे छोटे पासबुक, नोंदीचे रजिस्टर, युपीआयडी स्कॅनर व मशिन मिलन लॉजचा परवाना फॉर्म, रोख रक्कम 5,700 व निरोधची  पाकीटे असा एकुण 25 हजार 700 रूपयांचा माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन आरोपी  दिलीप सिध्दाप्पा मंगरुळे, संतोष नामदेव पवार यांचेविरुध्द मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम अन्वये तामलवाडी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 
Top