तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात गुरुवारी दि. 23 एप्रिल रोजी  पालिकेचावतीने पोलिस बंदोबस्तात प्रथमच प्रभावी अशी अतिक्रमण हटाव मोहीम  राबवण्यात आली. यावेळी प्रथमच दुकानाच्या कोरणीपासून अतिक्रमणे काढण्यात आले. कच्च्या अतिक्रमणानंतर पक्के केलेले अतिक्रमणे यावेळी हटवण्यात आले. यामुळे बऱ्याच वर्षानंतर प्रथमच श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार परिसर, शुक्रवार पेठ, भवानी रोड, महाद्वार रोड या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

यात कम हटाव मोहिमेचे स्वागत भाविकांसह शहरवासीयातून होत आहे. मात्र हे अतिक्रमणे पुनश्च होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात व्यापारी जागांना प्रचंड पैसा मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले होते. फुटपात पुढेही अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात होते. या  फुटपाथ वरील अतिक्रमण दुकानाच्या माध्यमातून मागील दुकान दारांना लाखो रुपयांचे भाडे मिळत होते. यापूर्वी अनेक वेळा नगरपरिषद अतिक्रमण विभाग अतिक्रमणे काढताना कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार घडत होते. यात काही कर्मचारी जखमी ही होत होते. त्यामुळे यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे दिसून येत होते. मात्र यावेळी संपूर्ण नगरपालिकाच रस्त्यावर उतरल्याने यावेळी प्रथमच नगरपालिकेने कुणाची भीड भाड  न ठेवता सामान न्याय या पद्धतीने अतिक्रमणे हटवल्याने ही अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावी व यशस्वी ठरल्याचे दिसून आले. यावेळी प्रथमच नगर परिषदेने चक्क दुकानाच्या कोरणीपासून अतिक्रमण हटवले. दुकानाच्या कोरणीबरोबरच दुकानाच्या वरील भागातले पडदे त्यामुळे भवानी रोड वरील दोन्ही बाजूचे जवळपास दहा ते पंधरा फूट रस्ते अतिक्रमीत होते ते मुक्त झाले. विशेष म्हणजे या पुढील कालावधीत अतिक्रमण विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष गंगणे यांनी स्पष्ट केले आहे. 

या अतिक्रमण मोहिमेबाबत बोलताना मुंबईचे भाविक विनायक कुलकर्णी म्हणाले की, तीर्थक्षेत्र तुळजापूर विशेषता श्री तुळजाभवानी मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त असणे गरजेचे आहे. मात्र येथे तसे दिसून येत नव्हते. यावेळी अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावपणे राबवत असल्याचे पाहून आम्हालाही आनंद वाटला. या मोहिमेत सातत्य असावे व यापुढे या भागात अतिक्रमणे होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली.


 
Top