उमरगा (प्रतिनिधी)- येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर तथा पत्रकार बाबासाहेब कांबळे यांना उमरगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

बाबासाहेब कांबळे हे येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर या पदावर सेवेत होते. त्यांनी दैनिक पुढारी या वृत्तपत्राचे प्रतिनिधी आणि मराठवाडा साहित्य परिषदेवर कार्यकारणी सदस्य म्हणून त्यांनी काम केले. बुधवारी (ता.22) पहाटे साडेपाच वाजता अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी ते 58 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी येथील शासकिय विश्रामगृह येथे त्यांना उमरगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकार अविनाश काळे, पत्रकार मारुती कदम, पत्रकार शंकर बिराजदार, पत्रकार गो.ल. कांबळे, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विजय ओवांडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार नारायण गोस्वामी, सुभाष जेवळे, समीर सुतके, अंबादास जाधव, प्रदीप भोसले, अमोल पाटील, माधव सुर्यवंशी, विकास गायकवाड, विश्वास सोनकांबळे, विशाल देशमुख, शिक्षक राजू सुर्यवंशी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

 
Top