धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या पोलीस भरती मध्ये 35 विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य बाळासाहेब शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख होते.  यावेळी बाळासाहेब शिंदे म्हणाले की, भविष्यामध्ये आपणाला जो पगार मिळणार आहे तो जनतेच्या करातून मिळणार आहे.याची जाणीव ठेवून समाजसेवा करा. त्याचबरोबर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्यामुळे आपण या पदापर्यंत पोहोचू शकला याची सुद्धा जाणीव कायम आपल्या मनामध्ये ठेवा. अशा प्रकारचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

यावेळी डॉ.संदीप देशमुख म्हणाले की, महाविद्यालयामध्ये येत्या काळात आम्ही पोलीस भरती करिता विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहोत. याचा फायदा ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे असे ते म्हणाले.  यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी पक्षाचे समन्वयक डॉ .मंगेश भोसले यांनी परिश्रम घेतले. भरती प्रक्रियेत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभाग आणि स्पर्धा परीक्षा विभाग यांचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. या राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख प्रो.डॉ. केशव क्षीरसागर व स्पर्धा परीक्षा प्रमुख डॉ. मारुती लोंढे यांचे देखील प्राचार्यांनी कौतुक केले. भरती झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आकाश कोळगे याने धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. तर महिलांमधून अंकिता मोहन यादव या विद्यार्थिनीने धाराशिव जिल्ह्यातील प्रथम क्रमांक मिळवला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ.बी डब्ल्यू गुंड यांनी केले. तर आभार प्रा. माधव उगिले यांनी मानले. 

 
Top