धाराशिव (प्रतिनिधी)-  25 एप्रिलच्या मध्यरात्री परंडा तालुक्यातील कुंभेज येथील माजी सैनिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकणारी कुख्यात टोळी धाराशिव गुन्हा शाखेने 24 तासाच्या आत जेरबंद केली आहे. विशेष म्हणजे दरोड्यामुळे घाबरलेल्या लोकांना आरोपीचे वर्णन ही करता येते नव्हते. ग्रामीण भाग असल्यामुळे कोठेही सीसीटीव्ही नव्हता. त्यामुळे हे दरोडेखोर पकडणे पोलिस खात्यासमोर एक आव्हान होते. 

परंडा तालुक्यातील कुंभेज येथे कॅनालच्या बाजूला माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप हे शेतवस्तीवरच राहत होते. त्यांची पत्नी व ते झोपेत असतानाच दरोडेखोऱ्यांनी घरासमोर बाजेवर झोपलेले विश्वनाथ जगताप व त्यांच्या पत्नी यांच्यावर चाकूने हल्ला करीत सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेवून पळून गेल्याचा प्रकार घडला होतो. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे व त्यांच्या टीमने गुन्हा घडलेल्या ठिकाणी जावून भेट दिली आणि पाहणी केली. यावेळी पोलिसांनी आरोपीचे वर्णन विचारले असता घाबरलेल्या लोकांकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे आरोपीचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान ठरले होते. पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलिस अधिकारी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या सुचना प्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनात सचिन खटके, अमोल मोरे यांच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जावून आरोपींचा शोध घेतला. यावेळी पथकास गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली माहिती, गुन्हेगाराची गुन्हा करण्याची पध्दत यावरून आरोपी हे आनाळा येथील किरण पंडीत शिंदे, चेतन किरण शिंदे डोकेवाडी, विकास नागेश भोसले हिवडा, ज्ञानेश्वर लिम्या काळे व त्याचे साथीदार यांनी सदर दरोडा टाकला असल्याचे निष्पन्न झाले. हे सर्वजण डोकेवाडी शिवारात शेतात थांबलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने योग्य नियोजन करून आरोपींना सर्व बाजुंनी घेरत पकडण्याचा प्रयत्न केला असता काहीजण पळून जात असताना पोलिस पथकाने पाठलाग करीत आरोपीला जेरबंद केले. 

ही कामगिरी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सुर्वे, विनोद जानराव, नितीन जाधवर, बळीराम शेंडे, अमोल चव्हाण, शौकत पठाण, दयानंद गादेकर, राठोड, मुळे, बबन जाधवर, महेबुब आरव, रोहित दंडनाईक, विनायक दहिहंडे यांचा समावेश आहे. 


 
Top