भुम (प्रतिनिधी)-  सोलापूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गिरवली पाटी येथे डोकेवाडी येथील पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे व ईट यथीतील सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन महावितरणाच्या विरोधात व विविध मागण्यास साठी केलेल्या रस्ता रोको आज यशस्वी झाला महावितरणचे कार्यकारी अभियंता एन बी रडे यांच्या लेखी आश्वासनानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला.

गिरवली येथे चार वर्षांपूर्वी 33/11 के व्ही केंद्र मंजूर करण्यात आले होते. परंतु जागेचे पाहणी व नवीन निविदा प्रक्रिया अनेक दिवसापासून प्रलंबित होती सदरील केद्र चालू झाल्यानंतर डोकेवाडी गिरवली सोनेवाडी सह अनेक गावना योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठा होणार होता. तसेच ईट येथील मुख्य 133 केवी वरील भार कमी होऊन ईट  परिसरातील दहा गाावची ही समस्या सुटणार होती, परंतु महावितरणच्या भोंगळ कारभार व राजकीय ताळमेळ जुळून न आल्यामुळे ही समस्या अनेक वर्षापासून पुढे ढकली जात होती. 

आज अखेर महामार्ग अडवल्यानंतर महावितरणचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर सदरील रस्ता रोको मागे घेण्यात आला. सदरील रस्ता रोको यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे, सुनील देशमुख, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य राजाभाऊ हुंबे, ग्रामपंचायत सदस्य सयाजी झुंबे आदी उपस्थित होते.

 
Top