भुम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव आयोजित प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जिल्हास्तरीय द्वितीय बक्षीस केंद्रीय प्राथमिक शाळा आष्टा शाळेने पटकावले.
जिल्हास्तरीय पथकाने उपशिक्षणाधिकारी कथले यांच्या नेतृत्वाखाली शाळेला भेट देऊन परसबागेची पाहणी केली. विद्यार्थ्यांना पोषण आहारात दररोज योग्य तितका प्रथिनयुक्त आहार मिळावा व आहारात स्थानिक पातळीवर भाजीपाला उपलब्ध व्हावा यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेचे तात्कालिक मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी शाळास्तरावर परसबाग स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानुसार आष्टा शाळेतील परसबागेस तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे व जिल्हा स्तरावरील द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. परसबाग तयार करण्यासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी, कार्यालयीन विस्ताराधिकारी साळुंखे, आष्टा बीटचे विस्तारअधिकारी टकले, केंद्रप्रमुख मुळे, शाळेचे माजी मुख्याध्यापक भोसले, माजी शिक्षक तांबे, नलावडे, नाईकवाडे, भैरु गोरे, उपळकर, जगताप, डांगे, नलवडे, स्वयंपाकी इंदुबाई दिवाने व मदतनीस मनीषा शिंदे यांचे सहकार्य लाभले.
