तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नियम डावलून सिहासन पूजा  मंगळवारी दि. 21 एप्रिल रोजी सकाळी घालव्यात आल्याची घटना उघडकीस आला. याप्रकरणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनी सुरक्षारक्षक, मंदिर गृह गर्भ राहतील संबंधितांना नोटीस बाजवले. नंतर या प्रकरणी संबंधित पुजाऱ्यास 5 वर्षांसाठी मंदिर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच खासगी सुरक्षा रक्षक कंपनीवर 1 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

या प्रकाराने मंदिर सुरक्षा व्यवस्था त्रुटी उघडकीस झाली.  तुळजाभवानी मंदिर सीसीटीव्हीच्या कक्षेत असून, सुरक्षारक्षकही मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. तसेच मंदिराचा स्टाफ हि मोठ्या प्रमाणात असताना  ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मंदिरात प्रशासनाने आपली भूमिका कडक करणे गरजेचे बनले आहे. देवीजीस रोज सकाळी 5 आणि सायंकाळी 2 अशा एकूण 7 सिंहासन पूजा होतात.  मंदिर परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही यंत्रणा असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने भाविकांत नाराजी पसरली आहे. आता तरी मंदिर संस्थान प्रशासन नियमांचे पालन कडकपणे करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 
Top