परंडा (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने परंडा येथील जिल्हा परिषद शाळा येथे प्रख्यात कवी गायक आनंद शिंदे यांचा शिंदेशाही गाण्याचा कार्यक्रम युवा नेते मल्हार पाटील यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न. या भीम गीतांचा भव्य महासंगीत सोहळा यामुळे वातावरण भारावून गेले. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गायक आनंद शिंदे यांच्या सुरेल गायनाने भीमगीतांचा जल्लोष शिगेला पोहोचला. जोश, उत्साह आणि अभिमानाने भरलेला हा ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर जयभीमच्या घोषणांनी दुमदुमला आणि प्रत्येक हृदयात अभिमानाची ज्योत पेटली..!

याप्रसंगी भाजपा नेते सुजितसिंह ठाकूर, युवा नेते मल्हार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, समाज कल्याण सभापती  विश्वास कोकणे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, भाजपा नेते गौतम लटके, जयदेव गोफणे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, जिल्हा परिषद सदस्य रेवन ढोरे, नगरसेवक तथा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, नगरसेवक राहुल बनसोडे, ॲड. जहीर चौधरी, तानाजी पाटील, धनाजी गायकवाड महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रियंकाताई क्षीरसागर, शहराध्यक्ष ज्योतीताई भातलवंडे, शुभदाताई शेलार उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  दिपक गायकवाड, निशिकांत क्षिरसागर, धनंजय काळे, अजिम हन्नुरे, गौरव पाटील, मनोहर पवार, अमर ठाकूर, रामदास गुडे, रामकृष्ण घोडके, सिध्दीक हन्नुरे, सुरज काळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महायुतीचे जि.प., पं.स. सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top