धाराशिव (प्रतिनिधी)-  ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद अंतर्गत धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्व वर्गवारीच्या एकुण 594 योजना मंजुर असुन, त्यापैकी 593 योजनांना कार्यारंभ देण्यात आलेले आहे. 338 योजना पुर्ण झालेल्या असुन उर्वरीत 255 कामे प्रगतीत आहेत. जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळजोडणीचे एकुण उद्दिष्ट 2 लक्ष 88 हजार 559 निश्चित करण्यात आले होते, त्यापैकी 2 लक्ष 64 हजार 274 इतके नळजोडणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्याची टक्केवारी 91.58 इतकी आहे.

एकुण 201 योजना सुधारीत मान्यतेस्तव प्रस्ताव सादर करण्याचे उदिष्ट असुन त्यापैकी शासनास सादर केलेल्या सुधारीत मान्यतेपैकी 120 योजनांना मान्यता मिळालेली असुन शासनाकडे 48 प्रस्ताव मान्यतेस्तव सादर करण्यात आलेले आहेत.अदयाप 33 प्रस्ताव सादर करणेसाठी प्रस्तावीत आहे.जानेवारी ते एप्रिल 2026 अखेर विंधन विहिर अधिग्रहण/खाजगी पाण्याचे टँकर कोणताही प्रस्ताव आलेला नाही.

या योजनेमुळे विशेषतः ग्रामीण महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, वेळेची बचत होऊन त्यांना इतर उपयुक्त कामांसाठी वेळ देता येत आहे.तसेच सुरक्षित पिण्याच्या पाण्यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीकडेही ग्रामस्थांचा कल वाढताना दिसतो आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या कार्यालयाकडून ही कामे वेगाने सुरू असून,उर्वरित कामेही लवकर पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.जल जीवन मिशनच्या माध्यमातून “पाणी हेच जीवन” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न धाराशिव जिल्ह्यात यशस्वीपणे होत असल्याचे चित्र आहे.

 
Top