भूम (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत कार्यालय,पाथरूड यांच्या सौजन्याने गावातील व बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवासासाठी बस स्थानकावर आर ओ चे शुद्ध थंडगार पाणी मोफत पाणपोईच्या माध्यमातून उपलब्ध केले. या उपक्रमाचे गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
भूम तालुक्यातील अनेक लांब पल्ल्याच्या बसचे जंक्शन असलेले पाथरूड या ठिकाणी प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते,अशातच उन्हाचा पारा जवळपास 42 अंश डिग्री सेल्सिअसच्या वरती गेल्याने नागरिकांची उष्णतेने पुरती हैराण उठली आहे,या बाबींचा विचार करून ग्रामपंचायत कार्यालय पाथरूड यांनी पुढाकार घेऊन प्रवासी व गावकऱ्यांसाठी 2000 लिटर क्षमता असलेल्या आर ओ चे थंडगार पाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आणि याचे उद्घाटन गावातील प्रमुख व्यक्तींच्या हस्ते संपन्न झाले.
निश्चितपणे या थंडगार पाणपोईचा फायदा गावकऱ्यासह प्रवाशांना कडक उन्हाळ्यामध्ये होईल असे मत या प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ चेतन बोराडे,युवा उद्योजक भाऊसाहेब बोराडे,विभाग प्रमुख गजेंद्रजी खुणे,कांतीलाल तीकटे,जयराम तीकटे,युवराज तीकटे, ग्राम अधिकारी महादेव गिरी,दत्तात्रेय पवार,राजाभाऊ वडेकर,भैरोबा आठवले,बाबासाहेब वाळके,संतोष येडे,शिवाजी तीकटे,नागेश पवार,विलास जाधव,योगेश बोराटे,लिपिक अशोकराज बोराडे,निळकंठ तात्या बोराडे,योगेश तीकटे,काका टिळक यांच्यासह इतर गावकरी आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
