धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये विश्ववंदय, भारतरत्न, महामानव व भारतीय संविधानकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठया उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
प्रथम प्राचार्य नंदकुमार नन्नवरे व मान्यवरांच्या हस्ते डॉ .बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी यावेळी डॉ . बाबासाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यासोबतच त्यांचे प्रेरणादायी चरित्र कायमच भारतीयांच्या मनात ज्योत पेटवती ठेवेल, असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला. तर सलग आठ तास अभ्यास करून मुलांनी यावेळी अनोख्या पध्दतीने अभिवादन केले. प्रशालेच्या वतीने वक्तृत्व, निबंध व चित्रकलेच्या माध्यमातून त्यांच्या चरित्राचा व कार्याचा जागर करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, श्रीमती बी.बी. गुंड, राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ, कुमार निकम, प्रवीण बागल, बालाजी गोरे व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
