तुळजापूर (प्रतिनिधी)-  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने यांना अभिवादन करण्यासाठी महामानव डॉआंबेडकर पुतळ्याजवळ आंबेडकर प्रेमींनी 38 अंश सेल्सिअस तापमानात मोठी गर्दी केली होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भीमगीते गायन, रक्तदान शिबिर, अन्नदान उपक्रमांचे आयोजन करून अभिवादन केले.

जयंतीच्या पार्श्वभूमीवर योग्य वाहतूक नियोजन न झाल्याने आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकर प्रेमींना याचा त्रास सहन करावा लागला. या प्रकाराबद्दल आंबेडकर प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत होती.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांना विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नगराध्यक्ष विनोद गंगणे, गटनेते औदुंबर कदम, माजी नगरसेविका हेमा कदम, नगरसेविका प्रियंकाताई विजय गंगणे,  कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे,  माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, सागर कदम, गुलचंद व्यवहारे सह सर्वांना आजी-माजी नगरसेवक भाजपा अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

महाविकास आघाडीचे  न प गटनेते अमोल कुतवळ, अमर मगर, ऋषी मगर, रंजीत इंगळे, आनंद जगताप, सुधीर कदम, खरेदी विक्री संघ चेअरमन अनिता वाघे, उत्तम अमृतराव, अक्षय परमेश्वर, किरण कदम, काँग्रेस मागासवर्गीय सेल  शहराध्यक्ष  प्रमोद कांबळे, किरण यादव, श्याम पवार, नागनाथ भांजी, बाबासाहेब कदम, पिंटू पांडागाळे, राहुल खपले, गोरख पवार, सुनील शिंदे, छोटु पाटील, युसूफ शेख, श्रीकांत रसाळ, महादू कदम, अर्जुन भोजने, अजिंक्य दांडे, सुदर्शन वाघमारे, बालाजी तट, नरेश पेंदे, विराज जगदाळे असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष अमोल जाधव आपल्या पदाधिकाऱ्यांसह  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती निमित्ताने प्राचार्य चंद्रकांत घोडके घोडके, डॉ. पेटकर यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.


 
Top