भूम (प्रतिनिधी)-  शंकरराव पाटील कनिष्ठ (स्वतंत्र) महाविद्यालय, भुम येथील प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत असलेल्या हवालदार वसंत उत्तेश्वर यांचा सेवा निवृत्ती समारंभ अत्यंत आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य व संस्था सदस्य डॉ. सिंग एस. एन. उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत संस्थेचे उपाध्यक्ष बोराडे डी. डी., उपसचिव व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमात  हवालदार वसंत उत्तेश्वर यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करण्यात आला. या महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेले वसंत हवलदार यांनी या महाविद्यालयात 35 वर्ष सात महिने वरिष्ठ लिपिक म्हणून महाविद्यालयाची सेवा केली विद्यालयाचा विद्यार्थी ते विद्यालयाचा लिपिक अशी ओळख असलेल्या हवालदार यांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गंगाधर काळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. नाईक यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर श्रीराम मंदिर, कसबा भुम येथे भोजन व्यवस्था करण्यात आली होती.


 
Top