धाराशिव (प्रतिनिधी)-  राष्ट्रहितासाठी विज्ञानाचे सकारात्मक संशोधन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांनी केले. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन विद्यार्थ्यांच्या पोस्टर प्रदर्शनाने आणि व्याख्यान प्रसंगी ते प्राचार्य डॉ. देशमुख बोलत होते.

महाविद्यालयातील विज्ञान मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञानक्षेत्रील महिलांचा सहभाग विकसित भारतासाठी प्रेरक हे ब्रीद घेऊन यावेळी भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ के.एच वनंजे यांनी कृष्णविवर या वैज्ञानिक विषयावर मार्गदर्शन केले. 

पोस्टर सादरीकरणामध्ये एकुण 43 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी परिक्षक म्हणून रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ मकरंद चौधरी, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, डॉ.ए.देवकर, व्यंकटेश महाजन महाविद्यालय धाराशिव यांनी काम पाहिले. पोस्टर सादरीकरणामध्ये रसायनशास्त्र विभागातील गीतांजली बालाजी करवर प्रथम, संगणक विभागातील साक्षी रमेश हुंबे द्वितीय तर गणित विभागातील वैष्णवी मल्लिकार्जुन चोले तृतीय आणि उत्तेजनार्थ म्हणून वैष्णवी उमेश जाधव, शिवम शरद पाटील यांना पारितोषिक देण्यात आले. सदर प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ मंगेश भोसले, डॉ व्हि.ए.गायकवाड ,प्रा आर.आर कदम यांच्या सह सर्व विज्ञान विभागातील प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 
Top