भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील वाकवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. गुरुवार दिनांक 26 रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा सोहळा ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी, सुकटा गटाचे जि प सदस्य भाऊसाहेब मारकड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य खंडू गोयकर, माजी शिक्षणाधिकारी शिवाजी चंदनशिवे, केंद्रप्रमुख संजीवन खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी लावणी नृत्य, नाटिका, देशभक्तीपर, संत बाळूमामा यांच्या गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमामधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ग्रामस्थ, पालक व उपस्थित त्यांनी भरभरून दाद दिली. यामध्ये एकूण 52,350 रुपये इतकी बक्षीस रक्कम जमा झाली. पालक, ग्रामस्थ व उपस्थितांच्या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजा पूर्ण करणे सुलभ जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. यावेळी भूम तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमा |च्या यशस्वीतेसाठी वाकवड जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
