धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्लेसमेंट आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या परिसर मुलाखतीमध्ये महाविद्यालयातील 28 उमेदवारांची निवड झालेली होती. त्या सर्व उमेदवारांना टाटा मोटर्स कंपनीचा रुजू आदेश आणि गुलाब पुष्प देऊन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर प्लेसमेंट ऑफिसर प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे यांचे देखील अभिनंदन करण्यात आले.

यापुढे देखील अशाच प्रकारच्या परिसर मुलाखतीचे आयोजन या विभागाकडून करण्यात यावे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी मदत करावी असे आवाहन डॉ. देशमुख यांनी यावेळी केले.


 
Top