धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर मेडिकल कॉलेजच्या मैदानावर विद्यापीठ कबड्डी स्पर्धा चालू असताना एका खेळाडूला खांद्याची नस बदल्यामुळे मोठ्या प्रमाणात वेदना होवू लागल्या. त्यामुळे तो खेळाडू बेचेन होवून मोठ-मोठ्याने ओरडू लागला. यावेळी फेजिओथेरीपी अभ्यासक्रमाला शेवटच्या वर्षात असणारे डॉ. प्रज्योत कावरे यांनी तातडीने लक्ष देवून धाडशाने त्या खेळाडूचा निळळलेला खंदा फेजिओथेरीपेद्वारे  उपचार करून खेळाडूला दिलासा दिला. 

ही शरिराच्या अंतर्गत होणारी दुखापत आहे. शरीराच्या वरून कुठलीही जखम दिसत नाही आणि बाहेरून रक्तस्त्राव ही होत नाही. पण सांधा म्हणजे खांदा जागेवरून निखळून खाली घसरतो. त्यामुळे आतून वेदना होते. आणि जिथे नसला नुकसान असते तिथे प्रचंड वेदना होतात.  त्यामुळे पेशंट अशा  पेशंटला हात लावणे म्हणजे जोखमीचे काम असते.

जिवाच्या आकांताने ओराडणाऱ्या पेशंटला दिलासा देऊन. तशाच परिस्थितीत त्याच सांधा काही विशिष्ट कोनात फिरवून परत जागेवर बसवणे हे माझ्या मते खूप अनुभवी तज्ञांचे काम असते. त्यामुळे अशा आणिबाणीच्या प्रसंगी डॉ. प्रज्योत कावरे याने ही परिस्थिती खूपच कौशल्याने हाताळली आणि  पेशंटला   दिलासा दिला. त्यामुळे डॉ. कावरे यांचे अभिनंदन होत आहे.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top