धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई शाखा धाराशिवच्या वतीने येत्या शुक्रवारी, २७ मार्च रोजी शहरात 'गंगाधर करंडक', कलावंतांचा मेळावा आणि भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शनिवार 27 मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होणार आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य विशाल शिंगाडे यांनी केले आहे.

या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, मुख्याधिकारी निता अंधारे, नगराध्यक्ष नेहा काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार ) चे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, प्रमुख कार्यवाह धनंजय (नाना) शिंगाडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य मुंबई यांच्या सह विविध राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव आयोजित गंगाधर करंडक स्पर्धा ही 27, 28 आणि 29 मार्च रोजी होणार असून यात नावलौकिक आणि प्रसिद्ध नाट्य संस्थांनी भाग घेतला आहे. 30 आणि 31 मार्च राज्य स्तरीय नृत्य स्पर्धा होणार असून यात राज्यातील नृत्य स्पर्धक सहभागी होणार आहेत.तसेच कलावंतांसाठी एक एप्रिल रोजी भव्य असा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या सर्व कार्यक्रमात जिल्ह्यातील कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

या सर्व कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य विशाल शिंगाडे, राजेंद्र अत्रे, शेषनाथ वाघ, डॉ.गणेश शिंदे,डी. जी.कुलकर्णी, रोहित कुलकर्णी, सुगत सोनवणे, ताहेर शेख, विजय उंबरे, अविनाश बनसोडे , प्रसेनजीत शिंगाडे,यशवंत शिंगाडे, सारीपुत शिंगाडे, सुमित शिंगाडे, शशिकांत माने,प्रदीप गायकवाड, भैरू कसबे, सुरेश देवकुळे,प्रमोद जोगदंड, अंबिका आगळे,

निकिता साळुंके, दिशा सोनटकके, रिया राठोड, सुमेध चिलवंत, दिनेश दणाने, प्रवीण सोनवणे, प्रियांका पोतदार, रिया राठोड यांच्या सह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिवच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top