उमरगा  (प्रतिनिधी)-   बुधवार दि.२५ रोजी उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती उमरगा वतीने व तालुक्यातील सर्व महाराष्ट्र ग्रामीण बँक , स्टेट बँक ऑफ इंडिया ,   बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या  तालुवयातील सर्व  शाखा यांच्या  संयुक्त विद्यमाने उमरगा तालुक्यातील 119  स्वयं समुहांना 5 कोटी 32 लक्ष रक्कमेचे  समूहांला व वैयक्तिक योजनेतून  उद्योग करण्यासाठी  विविध बँकेकडून समुहांतील 14 महिला सदस्यांना   20 लक्ष 40 हजार रक्कमेचे कर्ज मंजुरीपत्र वितरण  मेळावा पंचायत समिती सभागृह  उमरगा येथे  आयोजित करण्यात आला होता .


सदरील बँक कर्ज मेळाव्याचे अध्यक्ष पंचायत समिती चे नूतन सभापती मां. ॲड .आकांक्षा ज्ञानराज चौगुले  मॅडम ,तसेच पंचायत समितीचे नुतन उपसभापती मा . सौ . रेखा दादा इंगळे मॅडम तसेच सदरील कर्ज मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती उमरगा गटविकास अधिकारी (वर्ग१ )  मा .प्रशांतसिंह मरोड सर तसेच तालुक्यातील बँकेचे शाखा व्यवस्यापक यामध्ये रोशन सर MGB बँक शाखा, उमरगा , SBI  बँकेचे व्यवस्थापक मा . डॉ अंकुश सर शाखा उमरगा मेन , SBI शाखेचे व्यवस्थापक मा शैलेज बिराजदार , बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक मा . राहुल सुरवसे सर ,  पंचायत समितीचे सर्व विस्तार अधिकारी वर्ग आणि सर्व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष . उमरगा  उपस्थितीत सदरील कर्ज मंजुरी पा मेळाव्याचे  उद्घाटन मान्यवर चे हस्ते प्रतिमा पूजन करून झाले

या कार्यक्रमातून मा .ॲड  आकांक्षा चौगुले सभापती मॅडम यांनी महिलांनी कर्जाच्या माध्यमातून विविध व्यवसाय करावेत व आपल्या गटाच्या माध्यमातून विविध वस्तु तयार करून   त्याची विक्री केंद्र उभारावी व इतर माध्यमातून  वस्तुची विक्री करण्याविषयी प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवावे आपली आर्थिक उन्नती करावे असे सांगितले . त्यानंतर .

 तसेच SBI बँकेचे शाखा व्यवस्थापक डॉ अकुंश सर यांनी महिलांनी कर्जाच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करावेत व स्वयंसहायता समूहातील सर्व सदस्य महिलांनी वैयक्तिक उदयोग निर्माण करण्यासाठी शासनाच्या व बँकेच्या योजनेतून लाभ घ्यावे तसेच समुहांचे आर्थिक हिशोबाचे लेखे अद्यावत ठेवावे तसेच गटांच्या संदर्भातील  बँकेच्या कामकाजाची  विषयी मार्गदर्शन केले .


सदरील कर्ज मेळाव्यात खालील प्रमाणे बँक निहाय कर्ज मंजुरी प्राप्त झाली


महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तुरोरी 

कर्ज मंजूर गट - 7 

एकूण कर्ज मंजूर रक्कम 32  लाख


MGB गुजेंटी 

कर्ज मंजूर गट - 17 

एकूण कर्ज मंजूर रक्कम 47 लाख


SBI / आष्टा कासार

कर्ज मंजूर गट - 5 

एकूण कर्ज मंजूर रक्कम  24 लाख



 बँक ऑफ इंडिया / उमरगा 

कर्ज मंजूर गट - 19

एकूण कर्ज मंजूर रक्कम 1 कोटी 3  लाख


SBI - उमरगा (SC ) 

कर्ज मंजूर गट 13

एकूण कर्ज मंजूर रक्कम 64 लाख



बँक ऑफ महाराष्ट्र / येणेगुर

कर्ज मंजूर गट - 10 

एकूण कर्ज मंजूर रक्कम 45  लाख


बंक ऑफ महाराष्ट्र / उमरगा 

मंजुर गट - 15 

मंजुर रक्कम - 76  लाख 


SBI / बलमुर 

मंजुर गट - 2

मंजुर रक्कम - 6.50 लाख 


बँक ऑफ महाराष्ट्र  / मुरूम 

मंजुर गट - 5

मंजूर रक्कम - 14 लाख


SBI / दाळींब 

मंजूर गट - 5 

मंजुर रक्कम - 20 लाख 


SBI / मेन उमरगा 

मंजुर गट -4 

मंजुर रक्कम - 19 लाख 


SBI / गुजेंटी 

मंजुर गट -2 

 मंजुर रक्कम - 8.50 लाख 


MGB / नाईकचाकुर 

मंजुर गट - 13 

मंजुर रक्कम - 51 लाख  


SBI मुरुम 

मंजुर गट - 2

मंजुर रक्कम -12 लाख


तालुक्यातील एकूण कर्ज मंजूर गट  119

तालुक्यातील एकूण कर्ज मंजूर रक्कम 05 कोटी 132 लाख व विविध बँकेकडून वैयक्तिक कर्ज  योजना  उदयोगासाठी कर्ज 14 महिला सदस्य 20 लाख 40 हजार कर्ज मंजुरी पत्र व वाटपाचा अशा प्रकारे सदरील कर्ज मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते गटातील महिला सदस्यांना मंजुरी पत्र देण्यात आले .सदरील कर्ज मेळावा आयोजित करण्यासाठी पंचायत समिती उमरगा  येथील सर्व वरिष्ट अधिकारी,सर्व शाखा व्यवस्थापक,तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील तालुका अभियान व्यवस्थापक,तालुका व्यवस्थापक,प्रभाग समन्वयक,प्रभाग संघ व्यवस्थापक व सर्व CRP ,कृषी सखी,,बँक सखी, FL CRP ,प्रभाग संघ यांनी मोलाचे सहकार्य केले .

 
Top