तेर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तेर येथे संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या वार्षिक यात्रोत्सवाला 13 एप्रिलपासून प्रारंभ होत असून, या अनुषंगाने तेर येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला.
संतश्रेष्ठ श्री गोरोबाकाका देवस्थान हे एक उत्तम धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून पहिल्या टप्प्यात महाद्वार, नगारखाना, सभामंडप, संरक्षक भिंत, शौचालय, दर्शनबारी, भक्त निवासाचे उर्वरित काम, छोट्या व्यावसायिकांसाठी दुकाने तसेच विद्युतीकरण अशी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे पवित्र तेर नगरीचे सौंदर्य आणि भक्तांसाठीच्या सुविधा अधिक समृद्ध होणार आहेत. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना कामाचा दर्जा उत्तम राखून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोरे, शाखा अभियंता ओंकार जोशी, पद्माकर फंड, नवनाथ नाईकवाडी, विठ्ठल लामतुरे, भास्कर माळी, राहुल गायकवाड,मंगेश फंड, सुनिल गायकवाड,अमोल थोडसरे, प्रतिक नाईकवाडी, नवनाथ पसारे, प्रवीण साळुंके, बिभीषण लोमटे, पाडुरंग बगाडे, संभाजी कांबळे, अनिकेत बिटे, हणुमंत कोळपे, मेघराज हेगडकर, विष्णू एडके, नारायण साळुंके आदी उपस्थित होते.

