तुळजापूर, (प्रतिनिधी)- मिती फाल्गुन शु. 15 (मंगळवार, दि. 3 मार्च रोजी सायंकाळी होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री देवीजींच्या पूजाविधीत बदल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मंगळवार, दि. 3 मार्च रोजी सायंकाळी 6.15 ते 6.40 घाट देणे, पूजेस हाक मारणे, पुजारी श्रीदेवीजीजवळ येणे, निर्माल्य विसर्जन, सायंकाळी 6.44 वाजता श्रीदेवीजींना सोवळ्यात ठेवण्यात येईल. चंद्रग्रहण सुरू: सायं. 6.44, चंद्रग्रहण समाप्त: सायं. 6.48 सायंकाळी 6.55 ते 7.09 श्री देवीजींची सिंहासन पूजा
पंचामृत स्नान, शुद्ध स्नान, आरती व धुपारती होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
