धाराशिव (प्रतिनिधी)-  शेतकऱ्यांच्या नशिबीचे दृष्टचक्र काही केल्या संपत नाही. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस, तर पिकाला भाव नसणे यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाकडून हिरावला जात आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत 148 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, 2025 च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पुर्णपणे बिघडले. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर माती, पशुधन वाहून गेले. तर घरदारात पाणी शिरले. यामुळे हाताश झालेल्या शेतकऱ्याला सरकार यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत करेल असे वाटत असतानाच सरकारने मोठी घोषणा केली परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना अल्प स्वरूपात मदत मिळाली. पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकरण ठप्प झाले. हाताश झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने म्हणावी तशी मदतही केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या धाराशिव जिल्ह्यात वाढल्या. जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत 148 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी अनेकांवर खाजगी सावरकारासह बँकेचे कर्ज होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराला मिळणारी 1 लाखाची मदत 148 पैकी 112 पात्र ठरले असले तरी त्यापैकी 106 आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराला मदत मिळाली आहे. 


25 शेतकरी परिवार अपात्र

148 पैकी 25 आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराला जिल्हा प्रशासनाने 1 लाख रूपये देण्याच्या मदतीसाठी अपात्र ठरविले आहे. तर 11 आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाला जिल्हा प्रशासनाने मदत करण्यासाठी चौकशी चालू असल्याचे सांगून त्याची फाईल प्रलंबित ठेवली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराला आर्थिक मदत देणे आवश्यक असताना डिसेंबर 2025 मध्ये 4, जानेवारी 2026 मध्ये 5 आणि फेब्रुवारी 2026 मध्ये 2 आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाला प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे मदत मिळण्यास विलंब होत आहे. 


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top