धाराशिव (प्रतिनिधी)- प्रियदर्शनी मराठी प्राथमिक शाळा, खाँजा नगर, धाराशिव येथे जागतिक महिला दिन मोठया उत्साहात संपन्न झाला.  कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.जी. सगरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व महिला दिनानिमित्त शाळेत माता-पालक यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका इनामदार बी.एफ. यांचा सत्कार पुष्पगुच्छ देवून संस्थेचे अध्यक्ष जे.जी. सगरे यांनी केला. 

यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून आशा सतिश जटाळ या उपस्थित होत्या. यांचा सत्कार शाळेच्या मु.अ. इनामदार मॅडम यांनी पुष्पगुच्छ देवून केला. या कार्यक्रमा प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका इनामदार बी.एफ. यांनी प्रास्ताविकपर भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा, माता-पालक संघासमोर सांगितला व सर्वांना महिला दिनाच्या गुलाब-पुष्प देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्षीय भाषणातून जे.जी. सगरे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या कार्याचा गुणगौरव सांगितला व शाळेतील उपस्थित मुलींचा गुलाब पुष्प देवून सन्मान केला. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार शिंदे एस.आर. यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.


 
Top